नामंजूर "By A Kernel Programmer"
( एक विडंबन ) संदीप खरे क्षमस्व
नामंजूर नामंजूर नामंजूर !
नामंजूर नामंजूर नामंजूर !
जपत design ला कोड लिहीणे नामंजूर,
अन् लिहिलेला कोड doc करणे नामंजूर,
मी ठरवावी दिशा in/out param-ची
interface-शी प्रामाणिक राहणे नामंजूर !!!
नवे features मिळावे मला support नको,
जुन्या कोड चा clean-up किव्वा port नको,
EOD (End of Day) माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा,
manager जाण्याची वाट पहाणे नामंजूर !!!
Assembly-त कोड करून मारतो shine मी,
Kernel debug करतो line-by-line मी,
Bug सोडवता होतो भेजा चक्काचूर,
भल्या पहाटे घरी परतणे नामंजूर !!!
linked lists, btrees, pagetables चाच ध्यास मला,
pointers to pointers चा खेळच आहे हा सगळा,
रोख memory इथेच malloc अन free व्हावी,
valgrind मारुन mem-leak शोधणे नामंजूर !!!
" मी kernel-panic ला शाप मानले नाही,
अन extra printk ला पाप मानले नाही,
बग मोठा ज्यातुन एकही निघाला नाही,
कोड असला मी अद्याप लिहिला नाही "
kdb gdb असली टूल्स भारीच जरी,
printk नी debug करण्याची मौज़ खरी,
favourite editor emacs असणे मज समजे,
पण emacs चा गर्व वहाणे नामंजूर !!!
-Amit :)
Thursday, April 03, 2008
नामंजूर
scribbled by Amit around 7:04 PM 12 reactions
Subscribe to:
Posts (Atom)